Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशएकाच सुईचा वापर केल्याने ४६ जणांना एचआयव्ही

एकाच सुईचा वापर केल्याने ४६ जणांना एचआयव्ही

लखनौ – एकाच सुईचा वापर करुन अनेक रुग्णांवर उपचार केल्याने जवळपास ४६ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या उन्नाओ जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी बोगस डॉक्टर राजेश यादवला पोलिसांनी बुधवारी अटक केली.

राजेश यादव या बोगस डॉक्टरला बांगारमाऊ या शहरातून अटक करण्यात आली असून जिल्हाधिकारी रवी कुमार एन. जी. यांच्या निर्देशानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगरमाऊ स्टेशन रोडवर आणि पालिया गावामध्ये एका झोपडपट्टीत तात्पुरता दवाखाना उभारुन रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप यादव याच्यावर आहे. हा बोगस डॉक्टर यापूर्वी एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून कामाला होता. तिथे काम करताना या बोगस डॉक्टरने औषधांविषयी माहिती मिळवल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक अरुण प्रताप सिंग यांनी सांगितले आहे. कंपाऊंडर म्हणून काम करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे या बोगस डॉक्टरने स्वत:चा दवाखाना सुरू केला. या डॉक्टरने लिहून दिलेल्या ओषधी स्वस्त असल्याने रुग्णांची देखील त्याच्या दवाखान्यात गर्दी होत होती, अशी माहिती सिंग यांनी दिली आहे.
३ फेब्रुवारीला झालेल्या आरोग्य शिबिरादरम्यान जवळपास ४६ लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. एकाच सुईचा वापर करुन अनेक रुग्णांवर उपचार केल्याने या रुग्णांना एचआयव्हीची लागण झाली होती. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments