भारतातील ९२ टक्के लोकांची संपत्ती ६.५ लाखाहूनही कमी

- Advertisement -

दिल्ली: स्विस ब्रोकरेज क्रेडिट सुईसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतातील ९२ टक्के लोकांची मालमत्ता .५० लाखाहूनही कमी असल्याचं समोर आलंय. यामुळे देशात फक्त टक्के  लोकंच श्रीमंत असल्याची माहिती समोर आली आहे.

तसंच भारतातील ०.५ टक्के लोकांचं उत्पन्न ६५ लाखाहून अधिक असल्याची माहिती या अहवालातून स्पष्ट झाली आहे. भारतातील लोकांची सरासरी मालमत्ता ही ३ लाख,८८ हजारच्या आसपासची असल्याची माहिती या अहवालात स्पष्ट झाली आहे.पण तसंच या अहवालात एक आशावाद ही व्यक्त केला आहे. भारतातील आर्थिक वाढ पाहता २०२२ पर्यंत भारतीयांच्या सरासरी मालमत्तेत २०२२ पर्यंत विलक्षण वाढ होईल असं या अहवालाने सांगितलं आहे. आजच्या भारताची परिस्थितीही ९० वर्षांपूर्वीच्या अमेरिकासारखी आहे असंही या अहवालाने नोंदवलं आहे. जगात स्वित्झर्लंड ,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील नागरिकांकडे  सर्वाधिक मालमत्ता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारताचा शेजारी राष्ट्र असलेल्या चीनच्या ६२ टक्के लोकांची एकूण मालमत्ता ही साडेसहा लाख रूपयांहून कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

२०२२ पर्यंत लोकांच्या मालमत्तेमध्ये भारतात १२ टक्क्यांनी वाढ होईल असंही या अहवालात म्हटलं आहे. तसंच भारतीयांची एकूण संपत्ती गेल्या १७ वर्षात पाच पटीने वाढली आहे. पण तरी देखील भारतात गरिबीचं प्रमाण प्रचंड असल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -
- Advertisement -