७० वर्षाच्या वृध्दाने केले आपल्यापेक्षा ४० वर्षांनी लहान तरुणीशी लग्न?

- Advertisement -

नवी दिल्ली- नवरदेव झालेल्या या वृध्द गृहस्थाने आपल्यापेक्षा अर्ध्याहूनही कमी वयाच्या मुलीशी लग्न केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे वय ७० वर्ष असून त्याने आपल्यापेक्षा ४० वर्ष लहान मुलीसोबत लग्न केले आहे. अनेकांनी दावा केला होता की ते, अपोलो हॉस्पीटलचे संचालक राजेश हिंमत सिंह आहेत. पण हे सत्य नसल्याचे आता समोर आले आहे.

आसामशी निगडित आहे हा व्यावसायिक
– हा फोटो आसाम राज्याशी संबंध असणाऱ्या राजेश कुमार हिमतसिंगका यांचा आहे.
– राजेश कुमार यांना १९८७ मध्ये हिमतसिंगका एन्टरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आता त्यांची मुले आणि नातलग हा व्यवसाय सांभाळतात.
– हिमतसिंगका ग्रुप बियाण्याव्यतिरिक्त आदरतिथ्य, वाहन, मोटार या सारख्या अनेक व्यवसायांमध्ये आहे. त्यांच्या व्यवसाय आसाम, पश्चिम बंगाल शिवाय अन्य राज्यांमध्येही आहे.

फेसबुकवर अनेकांनी केलेले दावे
– फेसबुक Kuwali Das यांनी दावा केला आहे की, ते राजेश कुमार हिमतसिंगका यांना चांगलेच ओळखतात. त्यांनी लिहिले आहे की, ते राजेश अंकल यांना चांगले ओळखतात. ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत. पण त्यांनी जे केले आहे त्याचे आम्ही समर्थन करु शकत नाही. पत्नीच्या निधनानंतर त्यांना एकाकीपणा जाणवत होता. त्यांनी एखाद्या विधवा अथवा वयोवृध्द महिलेशी लग्न केले पाहिजे होते. त्यांनी एवढया लहान मुलीशी लग्न करायला नको होते. त्यांनी आपल्या नातु-पणतुंचाही विचार केला पाहिजे होता. त्यांनी ज्या मुलीशी विवाह केला आहे ती त्यांच्या सुनेपेक्षाही लहान आहे.

- Advertisement -
- Advertisement -