Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशप्रेयसीने नकार देताच त्याने, गाडी चालवतांना डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या!

प्रेयसीने नकार देताच त्याने, गाडी चालवतांना डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या!

पाटणा: चित्रपटात आपण जे दृष्य बघतो त्याच प्रमाणे एक भयंकर घटना घडली. विवाहित प्रेयसीने सोबत पळून यायला नकार म्हणून प्रियकराने धावत्या गाडीमध्ये स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्यावेळी युवक गाडी चालवत होता आणि प्रेयसी त्याच्या शेजारी बसली होती. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये नौबतपूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चिराऊरा गावाजवळ ही घटना घडली. सुजीत कुमार (२४) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजीतचे संबंधित तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. पण यावर्षी २७ एप्रिलला तिचे दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न झाले. सुजीतचे वडिल शेतकरी आहेत. यावर्षीच त्याने ग्रॅज्युएशनची परिक्षा दिली आहे. सुजीतने तिला फोन करुन भेटायला बोलावले होते. या तरुणीचे सासर गांधी मैदान परिसरात आहे. बुधवारी दुपारी ही तरुणी तिच्या स्कुटीवरुन आली व तिने फुलवारीशरीफ येथे स्कूटी पार्क केली.

त्यानंतर सुजीत तिथे गाडी घेऊन आला व दोघे ड्राईव्हसाठी निघाले. सुजीतने गाडी चालवत असताना तिच्याकडे पळून जाण्याचा विषय काढला पण तिने नकार देताच त्याने स्वत:जवळ असलेली बंदूक काढली व डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली.

अचानक घडलेल्या या प्रसंगाने हादरून गेलेल्या त्या तरुणीने स्थानिक नागरीकांच्या मदतीने सुजीतला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुजीतच्या कुटुंबियांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे पण यासंबंधी कोणताही पुरावा मिळालेला नाही. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक देशी पिस्तुल जप्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments