हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा ‘ज्ञानपीठ’ जाहीर

- Advertisement -

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील लेखिका कृष्णा सोबती यांना प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी सोबती यांना २०१७ वर्षाचा ज्ञानपीठ जाहीर झाला आहे.

९२ वर्षीय कृष्णा सोबती यांना ५३ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. सोबती यांना ११ लाख रुपये, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह बहाल करण्यात येईल. १९८० साली ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी कृष्णा सोबती यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. १९६६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली होती. कृष्णा यांच्या लेखणीतून उतरलेली ज़िन्दगीनामा, ऐ लड़की, मित्रो मरजानी, जैनी मेहरबान सिंह यासारखी पुस्तकं गाजली आहेत. २०१४ मध्ये भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यापूर्वी वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), विंदा करंदीकर या मराठी साहित्यिकांना आतापर्यंत ज्ञानपीठ प्राप्त झाला आहे.

- Advertisement -