Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशबापरे…आसारामची एवढी संपत्ती?

बापरे…आसारामची एवढी संपत्ती?

अहमदाबाद: अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या आसाराम जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. सकाळपासूनच आसारामचे भक्त त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. खुद्द आसारामदेखील न्यायालयात हरि ओमचा जप करत होता. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
 
स्वयंघोषित संत असलेल्या आसारामचे अनेक आश्रम आहेत. २०१३ मध्ये आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे. आसारामकडे जवळपास १० हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती २०१४ मध्ये गुजरात पोलिसांनी दिली होती. संपत्तीच्या मूल्याचा हा आकडा २०१४ मधील असल्यानं आता त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे १० हजार कोटींच्या संपत्तीत आसारामनं देशभरात घेतलेल्या जमिनींचा समावेश नाही.
एवढी संपत्ती

@आसारामच्या आश्रमाची बँक खात्यांमधील रक्कम आणि गुंतवणूक हजार ते १० हजार कोटीची संपत्ती

@गुजरातमधील १० जिल्ह्यांमध्ये आसारामच्या ४५ ठिकाणी जमिनी

@राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील आठ जिल्ह्यांमधील ३३ ठिकाणी जमीनी

@नारायण साईची अडीच हजार कोटींची संपत्ती उजेडात

@अहमदाबादमधील आश्रमातील ४२ बॅगांमध्ये सापडलेल्या काही कागदपत्रांमधून आयकर खात्यानं अडीच हजार कोटींची संपत्ती

@आसाराम आणि त्याच्या मुलाकडून ७५० कोटींचा दंड वसूल केला होता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments