Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
HomeदेशBharat Bandh : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत

Bharat Bandh : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. बुधवारी शेतकऱ्यांची भेट घेतल्यापासून त्यांनी घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं असल्याची माहिती आम आदमी पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंदला विरोधकांनी पाठिंबा दर्शवलेला असून केंद्र सरकारने यावरुन टीका केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केलं आहे.

दरम्यान, या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी शेतकरी संघटनांनी बंदला समर्थन दिलं आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येत आहे. तर, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments