Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकाँग्रेसच्या आमदारांनी भाजपाच्या आमदाराला विधानसभेत बदडले!

काँग्रेसच्या आमदारांनी भाजपाच्या आमदाराला विधानसभेत बदडले!

Gujrat Assembly

अहमदाबाद: गुजरात विधानसभेच्या सभागृहात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आमदारांना बोलू दिले जात नाही असा आक्षेप घेत बुधवारी काँग्रेसच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. काँग्रेसचे आमदार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपाच्या एका आमदाराला भर विधानसभेत बदडले. या प्रकरणी काही आमदारांना निलंबित करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आक्षेप काँग्रेस आमदारांकडून घेण्यात येत होता. मात्र, भाजपाच्या आमदारांना अध्यक्ष झुकते माप देत असल्याचेही काँग्रेसचे म्हणणे होते. यावरून विधानसभेत गोंधळ सुरू होता. विधानसभेच्या अध्यक्षांनी मंगळवारीच काँग्रेसच्या १५ आमदारांना निलंबित केले होते. निलंबित सदस्यांना विधानसभेतील मार्शल्सकरवी सभागृहाबाहेर काढण्यात आले होते.
काँग्रेस नेते अमित चवदा यांनी माफी मागितल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले. परंतु, त्यानंतर कृषी मंत्री आरसी फाल्दू  आपल्या खात्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करत असताना पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. यावेळी भाजपा आमदार बोलायला उभे राहिले असताना काँग्रेसच्या आमदारांनी त्याला घेराव घातला. भाजपाचे जगदीश पांचाल यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेसचे आमदार प्रताप दुधात यांनी त्यांना पट्ट्याने मारहाण केली. याशिवाय, काँग्रेसकडून सभागृहातील माईकची तोडफोड करण्यात आल्याचेही समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments