Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशमध्यप्रदेशच्या सत्तेसाठी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव

मध्यप्रदेशच्या सत्तेसाठी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव

Shiv Raj Singh Chauhan, madhya pradesh crisis, भोपाळ : मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात आहे. मध्यप्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी टळल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने ४८ तासांमध्ये बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी दाखल केलेली ही याचिका मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्या विरोधातील आहे. प्रजापती यांनी करोना विषाणूचे कारण देत विधानसभा २६ मार्च पर्यंत स्थगित केली आहे. यावर भाजप आमदारांनी गदारोळही केला.

२६ मार्चपर्यंत स्थगित...

राज्यपाल लालजी टंडन यांचे अभिभाषण सुरू असताना गोंधळ झाल्याने काही मिनिटातच भाषण आटोपून निघून गेले. त्यानंतर अध्यक्ष प्रजापती यांनी विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित केल्याचे वृत्त आले. त्यानंतर उपस्थित भाजप आमदारांना धक्काच बसला. विशेष म्हणजे २६ मार्च याच दिवशी राज्यसभेची निवडणूक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments