Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशकेंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत आहे; सोनिया गांधींची टीका

केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत आहे; सोनिया गांधींची टीका

Sonia Gandhi

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या नागरिक संतप्त झाले आहेत. सर्वत्र आंदोलन होत असून लोकांचा भावना तीव्र झाल्या आहेत. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज दाबणं चुकीचं आहे. असा हल्ला सोनिया गांधींनी चढवला आहे.

सोनिया गांधींनी एका व्हिडीओ टेपव्दारे केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकणं हे सरकारचं काम असतं, पण हे सरकार जनभावनेचा अनादर करत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून गोंधळ सुरु आहे. सर्वत्र असंतोष पसरला आहे. विविध संघटना राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलक रस्त्यावर उतरत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महिला, तरुण, विद्यार्थी, तरुणी, सर्वच रस्त्यावर उतरले आहेत. सर्वांनीच नागरिकत्व कायदा रद्द करावा अशी मागणी समोर आली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments