Saturday, April 27, 2024
Homeदेशमंदिराच्या आवारात दिव्यांग तरुणीवर बलात्कार, पुजाऱ्याला अटक

मंदिराच्या आवारात दिव्यांग तरुणीवर बलात्कार, पुजाऱ्याला अटक

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात २४ वर्षांच्या दिव्यांग तरुणीवर पुजाऱ्यानेच मंदिराच्या आवारात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी रामशंकर वैष्णव (वय २८) याला अटक केली आहे.

धमतरी येथे राहणारी २४ वर्षांची पीडित दिव्यांग तरुणी मंगळवारी कॉम्प्यूटर क्लासवरुन घरी परतत होती. हा तिचा रोजचा मार्ग होता. घरी परतत असताना तिला मंदिरात पुजारी म्हणून काम करणारा रामशंकर भेटला. तुझी आई मंदिराच्या आवारात काम करत आहे, असे सांगत त्याने पीडित मुलीला मंदिरात नेले. यानंतर रामशंकरने पीडित तरुणीला स्वतःच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. रामशंकरच्या अत्याचारामुळे पीडित तरुणी बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आल्यावर रामशंकरने तिला धमकी दिली. या प्रकरणाची वाच्यता बाहेर करु नकोस, असे त्याने पीडितेला सांगितले होते. घरी परतल्यावर पीडितेने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. अखेर कुटुंबीयांनी गुरुवारी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रामशंकरला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments