Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशछत्तीसगडमध्ये चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

Nuxals Attack, Chhattisgadhमहत्वाचे…
१. बिजापूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.
२. छत्तीसगड – तेलंगण सीमेवर झाली चकमक
३. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक एसएलआर, रायफल, ६ रॉकेट लाँचर तीन ग्रेनेड हस्तगत केले


छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. गडचिरोलीत सुमारे ३७ नक्षलवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर बिजापूरमध्ये ही कारवाई झाल्याने नक्षली संघटनांना मोठा धक्का बसला आहे.

बिजापूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. छत्तीसगड – तेलंगण सीमेवर ही चकमक झाली. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक एसएलआर, रायफल, ६ रॉकेट लाँचर आणि तीन ग्रेनेड हस्तगत केले. चकमक अजूनही सुरु असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील बोरिया गावालगत इंद्रावती नदीच्या विस्तीर्ण पात्रातील एका खडकाळ बेटावर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. या दोन चकमकींमध्ये एकूण ३७ नक्षलवादी ठार झाले. या कारवाईमुळे राज्यातील नक्षली चळवळीचे कंबरडेच मोडले. त्यापाठोपाठ छत्तीसगडमध्येही चकमक झाल्याने नक्षलवादी संघटनांना आणखी एक धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments