Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश‘एक नीरव मोदी है, दुसरा मोदी नीरव है!’ संसदेत काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी

‘एक नीरव मोदी है, दुसरा मोदी नीरव है!’ संसदेत काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी

congress

नवी दिल्ली: पीएनबी घोटाळ्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. एक नीरव मोदी है, दूसरा मोदी नीरव है!अशी घोषणाबाजी काँग्रेसतर्फे मंगळवारी संसदेत करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेत्यांनी या घोषणाबाजीत सहभाग घेतला.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींपेक्षा जास्त चुना लावला त्यानंतर हे दोघेही देशाबाहेर पळाले. नीरव मोदीला पळवून लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच हात होता. तसेच नोटाबंदीचा निर्णय नीरव मोदीसाठीच घेण्यात आला होता असे आरोप याआधीच काँग्रेसने केले आहेत. मात्र मंगळवारी संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करण्यात आली. एक नीरव मोदी आहे, दुसरे मोदी ‘नीरव’ म्हणजेच शांत आहेत अशा शब्दात ही टीका करण्यात आली.

मी देशाचा पंतप्रधान म्हणून नाही तर देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून देण्याआधी दिले होते. त्यावरूनही काँग्रेसने घोषणाबाजी केली. मी देशाचा चौकीदार आहे असे पंतप्रधान म्हटले होते. नीरव मोदी पळून जाताना चौकीदार शांत झोपी गेला होता का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला तसेच ‘देश का चौकीदार कहाँ गया, सो गया-सो गया’ अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. या सगळ्या घोषणाबाजीमुळे आणि गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.

त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत ‘नीरव मोदी, मोदी नीरव, एक नीरव मोदी है, दूसरा मोदी नीरव है!’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. याआधी सोमवारी राहुल गांधी यांनी मेघालयातील सत्ता स्थापनेवरूनही भाजपावर निशाणा साधला होता. संधीसाधू लोकांसोबत युती करत भाजपाने जनमताचा अपमान केला अशा आशयाचा ट्विट राहुल गांधी यांनी केला होता. तसेच पैशाच्या बळावर भाजपाने सत्ता काबीज केली असेही ट्विट त्यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments