Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशराहुल गांधींनी ‘एम्समध्ये’ घेतली लालू प्रसादांची भेट!

राहुल गांधींनी ‘एम्समध्ये’ घेतली लालू प्रसादांची भेट!

Rahul Gandhi, Laluprasad Yadav, Congressनवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजद नेते लालू प्रसाद यादव यांची ‘एम्स’ रुग्णालयात जाऊन भेट घेतली. लालू प्रसाद यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राहुल यांनी भेट घेतल्याचे वृत्त आहे. लालू किडनीच्या विकाराने त्रस्त असून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. चारा घोटाळ्यातील विविध प्रकरणात लालू प्रसाद यादव यांनी शिक्षा सुनाविण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे त्यांना रांची येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना एम्स रूग्णालयात हलविण्यात आले. काही दिवसांपूर्वीच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लालू प्रसादांची भेट घेतली होती.

#Congress President #RahulGandhi met #RJD chief #LaluPrasad, who is undergoing treatment for various ailments related to heart and kidney at #AIIMS in New Delhi

Read @ANI Story | https://t.co/Qxp0X6eNg3 pic.twitter.com/0Pydxt8OCY

मुलाचे लग्न, वडील तुरुंगात –
लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा येत्या १२ मे रोजी विवाह होत आहे. या विवाहसोहळ्यासाठी लालू  उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. लालू यांनी पॅरोल घेण्यासाठी नकार दिला आहे. लालूंच्या अंतरिम जामिनावर येत्या ४ मे रोजी सुनावणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments