Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशबापरे : ‘तो’ पत्रकार होता कोरोनाग्रस्त!

बापरे : ‘तो’ पत्रकार होता कोरोनाग्रस्त!

corona confirmed in kamal nath pc journalist daughterमध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये सत्तापालटं झाली त्याची चर्चाही खूप रंगली परंतु हे सर्व होत असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित एका पत्रकाराची मुलगी कोरोनाबाधित होती. त्यामुळे सर्व पत्रकारांची चाचणी केली जाणार आहे. यामुळे संपर्कात येणाऱ्या सर्व पत्रकारांना क्वारंटाईनला जावे लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जगभरात कोरोनाचा थैमान सुरु आहे. भारतात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र पत्रकाराची मुलगी कोरोनाबाधित आढळल्यामुळे गोंधळ उडाला. तो पत्रकार भोपाळच नाही तर दिल्लीतील पत्रकार परिषदेतसुद्धा उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी भोपाळ इथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत भोपाळच नव्हे तर दिल्लीतील पत्रकारही उपस्थित होते. त्यामुळे या सगळ्या पत्रकारांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments