Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकोरोनाच्या धसक्याने दिल्लीत शाळा, कॉलेज, चित्रपटगृहांना ताळे!

कोरोनाच्या धसक्याने दिल्लीत शाळा, कॉलेज, चित्रपटगृहांना ताळे!

Delhi school closes due to coronavirus, cinemas, theatres, colleges, arving kejriwal, covid-19, delhi, delhi schools, delhi chief minister, delhi news, corona, coronavirusदिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. हरयाणा सरकारनंतर दिल्ली सरकारनेही करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता दिल्लीत करोनाला साथीचा आजार घोषित केले आहे. ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

देशात करोना विषाणूचा धोका लक्षात घेत दिल्ली सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले. आता पर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये करोनाची लागण झालेले एकूण ७३ रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी मध्य प्रदेश, लडाथ, महाराष्ट्रात काही रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगवर देखील संकटाचे वादळ घोंघावू लागले आहे. दरम्यान, देशातील जनतेला करोनाला घाबरून जाण्याची गरज नसल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सरकार सतर्क असल्याचेही ते म्हणाले.

दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे चित्रपटा व्यवसायिकांच्या कमाईवर मोठा परिणाम होणार आहे. १३ मार्च रोजी इरफान खानचा अंग्रेजी मीडियम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तसेच २० मार्चला फरार हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याच बरोबर अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याचा मोठा परिणाम दिल्लीतील चित्रपटगृहांवरही होणार आहे.

 

देशभरात करोनाबाधितांची संख्या ७३ वर

सध्या देशातभरात १२ राज्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यात १२ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. भारतात आत्तापर्यंत एकूण ७३ जणांना करोनाची लागण झाल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारून स्पष्ट झाले आहे. यामध्ये १७ परदेशी रुग्णांचा समावेश आहे. चीनच्या वुहानमधून जगभर फैलावलेल्या या रोगाला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) महारोग म्हणून घोषित केलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments