Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशभारतात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली, ‘या’तारखेपासून मोहिमेला सुरुवात

भारतात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली, ‘या’तारखेपासून मोहिमेला सुरुवात

नवी दिल्ली : देशात सर्वांचेच लक्ष लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. लसीकरण हाच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.

लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील.

“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना लसीकरणात पहिले प्राधान्य असेल. त्यांची संख्या तीन कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ५० वर्षावरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे ५० पेक्षा कमी वयाचे लोक. या सर्वांची मिळून संख्या २७ कोटीच्या घरात असण्याचा अंदाज आहे” असे केंद्राने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पाडली. त्यात देशातील करोनाची सद्य स्थिती तसेच लसीकरणासाठी केंद्रशासित प्रदेश व राज्यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्य लसीकरणाला सुरुवात होण्याआधी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन पार पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments