Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशभाजपा नेत्याने महिला पत्रकारांबद्दल गलिच्छ विधान केल्याने कारवाईची मागणी

भाजपा नेत्याने महिला पत्रकारांबद्दल गलिच्छ विधान केल्याने कारवाईची मागणी

Tamil Nadu, Governor, Banvarilal Purohitचेन्नई: ‘कुणीही महिला मोठ्या व्यक्तीबरोबर झोपल्या शिवाय वृत्त निवेदक किंवा रिपोर्टर बनू शकत नाही’, असं भाजपा नेते शेखर यांनी फेसबुक पोस्टमध्ये टाकल्याने. पोस्टमुळे चेन्नईतील पत्रकारांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. शेखर यांच्या निषेधार्थ चेन्नईतील पत्रकार शुक्रवारी भाजपा राज्य मुख्यालयासमोर आंदोलन पवित्रा घेतला. 

एका पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकाराच्या गालाला हात लावल्यामुळे वादात सापडलेले तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी महिला पत्रकाराची माफी मागत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ताजी असतानाच आता भाजपाचे वरिष्ठ नेते एस.व्ही शेखर यांनी फेसबुक पोस्ट लिहित महिला पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.  ‘मदुरई युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अॅण्ड द वर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल’, असं शीर्षक या पोस्टला त्यांनी दिलं. ‘कुणीही महिला मोठ्या व्यक्तीबरोबर झोपल्या शिवाय वृत्त निवेदक किंवा रिपोर्टर बनू शकत नाही’, असं शेखर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. भाजपा नेत्याच्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे चेन्नईतील पत्रकारांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. शेखर यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, नुकत्याच अनेक तक्रारींमधून कडू सत्य बाहेर आलं आहे. या महिलांनी राज्यपालांवर प्रश्न उपस्थित केले. मीडियातील लोक हे तामिळनाडूतील तुच्छ, नीच आणि असभ्य लोक आहेत. त्यामध्ये काही अपवाद आहे. त्यांची मी इज्जत करतो. त्यांच्याशिवाय तामिळनाडूतील पूर्ण मीडियात आरोपी, ब्लॅकमेलर्सच्या हातात आहे. शेखर यांनी फेसबुक पोस्टचं क्रेडीट ‘थिरूमलाई एस’ नावाच्या व्यक्तीला दिलं आहे.

एस व्ही शेखर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, थिरूमलाई अमेरिकेतील भाजपाचे समर्थक आहेत. ते अमेरिकेला जाण्याआधी मला भेटले होते. नरेंद्र मोदींचे समर्थक असल्याचं थिरूमलाई यांनी सांगितलं. थिरूमलाई यांची पोस्ट शेअर करताना मी ती पूर्ण वाचली नाही. मी कधीच कुणाला शिवीगाळ करणार नाही. मला ती पोस्ट डिलीट करायची होती. व त्याआधी फेसबुकने माझी प्रोफाइल ब्लॉक केली. मी पुढील २४ तास फेसबुक सुरू करू शकत नाही, अशी सारवासारव शेखर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments