Placeholder canvas
Friday, April 26, 2024
HomeदेशBatla House Encounter : न्यायालयाने अरिझ खानला ठरवले दोषी

Batla House Encounter : न्यायालयाने अरिझ खानला ठरवले दोषी

१५ मार्च रोजी कोर्टाची शिक्षेवर युक्तिवाद सुनावणी 

delhi-court-convicts-ariz-khan-for-killing-inspector-mohan-chand-sharma-in-batla-house-encounter
delhi-court-convicts-ariz-khan-for-killing-inspector-mohan-chand-sharma-in-batla-house-encounter

दिल्ली: राष्ट्रीय राजधानीत सप्टेंबर २००८ मध्ये  झालेल्या बाटला हाऊस चकमकीत झाली होती यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इन्स्पेक्टर मोहन चंद शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरिझ खान याला दिल्ली न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. अरिझ खानचे दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचे कोर्टांने सांगितले आहे.

लाइव्ह लॉनुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी निकाल जाहीर करताना सांगितले की, “फिर्यादींनी दिलेल्या पुराव्यांवरून हा खटला सिद्ध झाला आहे आणि आरोपीला दोषी आहे यात काही शंका नाही. हे सिद्ध झाले आहे की आरोपी अरिझ खान शूटआऊट दरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याला कोर्टात हजर होण्याचा आदेश देवूनही तो हजर झाला नाही. त्यानुसार आरोपीस भारतीय दंड संहिता कलम १८६, ३३३, ३५३, ३०२, ३०७,१७४ए, ३४ए आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २७ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. ”

१५ मार्च रोजी कोर्टाची शिक्षेवर युक्तिवाद सुनावणी 

१९ सप्टेंबर २००८ रोजी दक्षिण दिल्लीच्या बाटला हाऊसमधील फ्लॅट (एल -१८) येथे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि कथित दहशतवाद्यांमध्ये चकमक घडली. राजधानीत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या सहा दिवसानंतर ही घटना घडली यात २६ लोक ठार झाले होते. या चकमकीमध्ये इंस्पेक्टर शर्मा आणि दोन दहशतवादी ठार झाले.

जुलै २०१३ मध्ये कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी शहजाद अहमद याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात त्याची याचीका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. चकमकीतून पळून गेलेल्या अरिझला फेब्रुवारी २०१८ मध्ये नेपाळमधून अटक करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments