Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकोरोनामुळे करावा लागला ऑनलाईन विवाह!

कोरोनामुळे करावा लागला ऑनलाईन विवाह!

due to corona virus online marriage in biharपाटणा (बिहार) : कोरोनाच्या हाहाकारामुळे देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच दरम्यान एका वेगळ्या पद्धतीत लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे नवरा-नवरी एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन लग्न केलं आहे. ही घटना बिहारमधील गाझियाबाद, पाटणा येथे घडली. याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.

पाटणाच्या समनपुरा येथे राहणाऱ्या मरहून हाजी मोहम्मद सलाउद्दीन यांची मुलगी सादिया नसरीनचा विवाह गाझियाबादच्या साहिबाबाद येथे राहणाऱ्या सैमुदुल हसन यांचा मुलगा दानिश रजासोबत झाला. हा विवाह 23 मार्च रोजी संपन्न झाला. यावेळी नवरा साहिबाबादमध्ये होतो आणि नवरी पाटणामध्ये होती. सध्या या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यामुळे नवऱ्याक़डचे मुलीकडे जाऊ शकत नव्हते. तसेच नवरीकडेचही नवऱ्याच्या घरी येऊ शकत नव्हते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाच्या परवानगीने ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्यात आला.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूने भारतात आतापर्यंत 540 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments