Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशत्या साडीमध्ये पाहून तिच्यावरुन नजर हटेना!

त्या साडीमध्ये पाहून तिच्यावरुन नजर हटेना!

महत्वाचे…
१. सोशल मीडियावर त्या महिलेची साडी चर्चेचा विषय ठरली आहे
२. महिला ती साडी नेसून घराबाहेर पडते तेव्हा ती सर्वांचच लक्ष वेधून घेते
३. स्वत:चे बुटिक असून, साडी नेसल्यानंतर प्रसिध्दीच्या झोतात


भोपाळ: सध्या सोशल मीडियावर एका महिलेची साडी चर्चेचा विषय ठरली आहे. जेव्हा ही महिला ती साडी नेसून घराबाहेर पडते तेव्हा ती सर्वांचच लक्ष वेधून घेते आणि चर्चेचा विषय ठरते. वंशिका चौधरी असे या महिलेचे नाव असून चलनातून बाद झालेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांपासून तिने प्रिंटेड साडी बनवली आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. नागदा येथे राहणाऱ्या वंशिका चौधरीलाही भरपूर दु:ख झाले होते. आपल्याजवळ असलेल्या जुन्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न तिला पडला होता. वंशिकाने या नोटा तिच्या साडीवर प्रिंट करुन घेतल्या. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांचे फोटो मोबाइलमधून डिलीट होऊ शकतात पण पाकिटात असणाऱ्या नोटांचे काय करणार. या नोटांची आठवण जपण्यासाठी तिला काहीतरी वेगळे कारयचे होते. त्यासाठी वंशिकाने त्या नोटा स्वत:च्या साडीवर प्रिंट करुन घेतल्या.

जेव्हा कधी मला जुन्या नोटांची  आठवण येईल तेव्हा मी ही साडी परिधान करत जाईन असे वंशिकाने सांगितले. वंशिका जेव्हा केव्हा या नोटांची साडी घालून बाहेर पडते तेव्हा प्रत्येकजण तिला पाहत बसतो. वंशिकाचे स्वत:चे एक बुटिक असून ही साडी नेसायला सुरुवात केल्यापासून तिला प्रसिद्धी मिळू लागली आहे सध्या या साडीचीच चर्चा रंगत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments