Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशशेतकरी संघटना आक्रमक, ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक

शेतकरी संघटना आक्रमक, ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक

नवी दिल्ली l केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चांमधून तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे. ८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे.

शेतकऱ्यांच्या संपाचा आज नववा दिवस आहे. मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत त्यात सुधारणा करु नये अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जाब, हरयाणा या राज्यातले शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांना अडवण्यात आलं असलं तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.

मात्र आत्तापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.त्यानंतर आता शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. असं असलं तरीही उद्या होणाऱ्या बैठकीला शेतकरी हजर राहणार आहेत.

कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे. मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत हीच आमची ठाम भूमिका आहे असं ऑल इंडिया किसान सभेचे कार्यकारी सचिव हनान मोलाह यांनी म्हटलं आहे.

आम्ही कालच सरकारला आमची मुख्य मागणी सांगितली आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, रद्द करण्यात यावेत ही आमची मुख्य मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments