Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशभाजपच्या ‘या’ माजी आमदाराला १० वर्षांचा तुरुंगवास!

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला १० वर्षांचा तुरुंगवास!

Kuldeep Singh Sengar,Unnao,Kuldeep Sengar,Sengar,Kuldeepउन्नाव : भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी केलेला दोषी माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर याला उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

कुलदीपसिंग सेंगर आणि त्याचा भाऊ अतुलसिंग सेंगरसह ७ दोषींना कोर्टाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या बरोबरच दोषींना प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड देखील भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या पूर्वी गुरुवारी कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, आपल्याकडून काही चुकीचे घडले असल्यास आपल्याला फाशी दिली जावी तसेच आपल्या डोळ्यात अॅसिड टाकले जावे असे सेंगर याने कोर्टापुढे म्हटले होते. ३ मार्च या दिवशी कुलदीपसिंग सेंगर दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. कुलदीपसिंग सेंगर याचा हत्या करण्याचा हेतू नव्हता, मात्र पीडितेच्या वडिलांना अमानुष मारहाण झाली त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ट्रायल कोर्टाने पोलीस हवालदार आमिर खान याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

कुलदीपसिंग सेंगरसह एकूण ११ आरोपी…

या प्रकरणात कुलदीपसिंग सेंगरसह एकूण ११ आरोपी होते. यांपैकी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. उर्वरित ७ जणांना कोर्टाने पीडितेच्या वडिलांची कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने दोषी धरले होते. कोर्टाने आपल्या आदेशात एसएचओ अशोक भदौरिया आणि सब इन्स्पेक्टर के. पी. सिंह यांना दोषी ठरवण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments