Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशतिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची नजरकैदेतून सुटका करा; पवार-ममतांची मागणी

तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची नजरकैदेतून सुटका करा; पवार-ममतांची मागणी

Mehbooba Mufti, Farooq Abdullah, Omar Abdullah, sharad pawar, mamata benerjee, ncp, नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर केंद्र सरकारने माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, महेबूबा मुफ्ती या तिघांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत. या तिन्ही मुख्यमंत्र्यांची सुटका करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, मुख्ममंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

जम्मू काश्मिरमध्ये कलम ३७० हटविल्यापासून तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारने नजरकैदेत ठेवले आहे. काश्मिरमध्ये शांतता असतानाही केंद्राने माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, महेबूबा मुफ्तींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या तिन्ही नेत्यांना नजरकैदेत ठेवून केंद्र सरकार काय साध्य करणार आहे. असा प्रश्न शरद पवार, ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. पवार आणि बॅनर्जी यांनी काढलेल्या सामुहीक पत्रकावर काही प्रमुख विरोधी नेत्यांच्या सह्या आहेत. माजी मुख्यमंत्री एच.डी.देवेगौडा,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, डी राजा, यशवंत सिन्हा, अरुण शौरींच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments