Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशआंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी!

आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी!

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.

विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे.

भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानेही नव्या करोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती.

मात्र, त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून करोनाच्या नव्या विषाणूनं देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या आज (३० डिसेंबर) २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments