Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशगुजरात ट्रेलर आणि राजस्थान इंटरव्हल- खासदार संजय राऊत

गुजरात ट्रेलर आणि राजस्थान इंटरव्हल- खासदार संजय राऊत

नवी दिल्ली: गुजरातच्या निवडणुका या ट्रेलर आणि राजस्थानच्या पोटनिवडणुका तर इंटरव्हल होता. आता संपूर्ण चित्रपट २०१९ ला पाहायला मिळणार असल्याची टीका करत शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले, की शिवसेनेचा बाण एकदा सुटला की तो परत येत नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुका स्वंतत्र लढवण्याचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपसोबतचे संबंध पराकोटीचे ताणले गेल्याने शिवसेनेने एकला चलो रेचा नारा दिला होता. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
राजस्थान आणि पंश्चिम बंगालच्या पोट निवडणुकामध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. राजस्थान पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. त्यावर बोलताना शिवसेना खा.संजय राऊत म्हणाले, की निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे. गुजरात निवडणुकीत भाजपचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांचा विजयरथ फार दुर जाऊ शकला नाही. त्यामुळे गुजरात निवडणुका म्हणजे ट्रेलर आणि राजस्थानचा निकाल हा इंटरव्हल होता. आता २०१९ ला संपूर्ण चित्रपट पाहायला मिळेल अशी टीका त्यांनी यावेळी केली.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ कागदावरच चांगला दिसत असल्याचा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. शेतकरी सध्याही आत्महत्या करतच आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाबाबत आता बोलणे उचित नसल्याचेही राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments