Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशमी नाचणाऱ्यांच्या नादी लागत नाही- आझम खान

मी नाचणाऱ्यांच्या नादी लागत नाही- आझम खान

Jaya Prada,Azam Kharn,samajwadi party

नवी दिल्ली:  समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर पलटवार केला आहे. जयाप्रदा कोण आहे ? नाचणाऱ्या-गाणाऱ्यांच्या मी नादी लागत नाही, असा टोला त्यांनी लगावला. जयाप्रदा यांनी आझम खान यांची पद्मावत चित्रपटातील खिलजी या पात्राशी केली होती. त्याला उत्तर देताना आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर टीका केली.

मी सध्या शैक्षणिक क्षेत्रात व्यस्त आहे. माझ्याकडे अशा लोकांच्या बोलण्यावर उत्तर देण्यास वेळ नाही. माझे लक्ष विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे आहे. मी नाचणाऱ्या-गाणाऱ्यांच्या नादी लागत नाही. जर मी असे केले तर राजकारण करू शकणार नाही, असे आझम खान यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शनिवारी माध्यमांशी बोलताना जयाप्रदा यांनी पद्मावत चित्रपटाचा हवाला देत अलाऊद्दीन खिलजीला पाहिल्यानंतर मला आझम खान यांची आठवण झाली, असे म्हटले होते. मी निवडणूक लढवताना त्यांनी मला खूप त्रास दिला होता, असा आरोपही त्यांनी केला.

उत्तर प्रदेशमधील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या होत्या. या मतदारसंघातून त्या २००४ ते २००९ पर्यंत खासदार होत्या. त्या अमरसिंह यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. अमरसिंह याना पक्षविरोधी कारवायांमुळे २०१० मध्ये पक्षातून काढण्यात आले होते. नंतर जयाप्रदा २०१४ मध्ये बिजनौरमधून आरएलडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.

रामपूरमधून निवडणूक लढवण्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या, आझम खान यांच्यामुळे मी तेथून निवडणूक लढवली नव्हती. रामपूरची जनता नेहमी त्यांच्याबरोबर उभी राहिली आहे. पक्षांतर्गत काहींनी विरोध केला. असे असूनही त्या विजयी झाल्या होत्या. कारण रामपूरच्या जनतेने त्यांना पाठिंबा दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments