Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशमी कधीही मुख्यमंत्री बनणार नाही : रजनीकांत

मी कधीही मुख्यमंत्री बनणार नाही : रजनीकांत

Rajinikanth, tamilnadu, chief minister, thaliava, tamilnadu chief minister, cm, rajnikant, rajnikanthचेन्नई : सुपरस्टार, रजनीकांत यांनी नव्या पक्षाची स्थापना करणार  असल्याची घोषणा केली. पक्ष आणि सरकार वेगवेगळे काम करतील असे धोरण जाहीर करताना, आपण पक्षाचे नेते असू मात्र मुख्यमंत्री कधीही बनणार नाही अशी घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूतील राजकारण पाहत असून लोकांना आता बदल हवा आहे, असे वक्तव्य रजनीकांत यांनी डीएमके आणि एआयडीएमके या पक्षांचा उल्लेख करत केले आहे. आपल्या पक्षात आपण युवक आणि शिकलेल्या लोकांना प्रवेश देणार असल्याचेही ते म्हणाले. याद्वारे आपण तामिळनाडूत नवे नेतृत्व तयार करण्याचे काम करणार असल्याचेही ते म्हणाले. याच कारणामुळे आपण स्वत: मुख्यमंत्री न बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

रजनीकांत यांनी सादर केलेल्या पक्षाच्या दुहेरी धोरणानुसार, पक्षात दोन भाग असणार आहेत. एक भाग हा पक्षाचे काम पाहील आणि दुसरा भाग हा सरकारचे कामकाज पाहील. आपला पक्ष कधीही सरकारवर हावी होणार नाही, असे रजनीकांत यांनी सांगितले. आपल्या पक्षात आपण शिकलेल्या लोकांना घेणार असून चांगली प्रतिमा असलेल्या लोकांना निवडणूक लढण्याची संधी दिली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.

जो पक्षाचा नेता असेल तो मुख्यमंत्री बनणार नाही आणि जो मुख्यमंत्री असेल तो पक्षाचा प्रमुख नसेल असे आपण ठरवल्याचे थलैवा रजनीकांत यांनी सांगितले. मी पक्षाचा प्रमुख असेल आणि दुसरे कुणी मुख्यमंत्री असेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्री हा राज्यातीलच व्यक्ती असणार आहे. शिवाय त्याच्याकडे राज्याबाबतचे एक व्हिजनही असेल असे रजनीकांत म्हणाले.

आमचा पक्ष हा स्वत: सरकारला प्रश्न विचारेल

आमचा पक्ष हा स्वत: सरकारला प्रश्न विचारेल. काही चूक झाली तर पक्ष चूक करणाऱ्यावर कारवाई करेल, अशी भूमिका रजनीकांत यांनी जाहीर केली आहे. आम्ही समांतर सरकार चालवणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आमच्याकडे मर्यादित संख्येने लोक आहेत. आम्ही त्यांचा योग्य वापर करू. तामिळनाडूच्या लोकांसाठी आमच्याकडे योजना आहे. या योजनेबाबत आम्ही लोकांमध्ये जाऊन चर्चा करू. या बाबत आम्ही नेते, पत्रकार आणि अधिकाऱ्यांशीही बोललो आहोत, मात्र कुणीही या योजनेवर सहमती दर्शवलेली नाही, असे रजनीकांत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments