मी भाजपच्या पराभवासाठी काम करेन : हार्दिक पटेल

- Advertisement -

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये रोज नवीन नाट्यमय घटना घडत आहेत. काल पटेल आरक्षण आंदोलनातील हार्दिक पटेलचे महत्त्वाचे सहकारी वरुण आणि रेश्मा पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. वरुण आणि रेश्माच्या भाजप प्रवेशाने हार्दिक पटेलने भाजपविरोधातील भूमिका अजून तीव्र केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हार्दीक पटेल यांना मुलाखतीसाठी निमंत्रण दिले आहे.

हार्दिक पटेल म्हणाला की, “काँग्रेसनं मला राजकारणात येण्याचं आमंत्रण दिलं. पण मी राजकारणात येणार नाही. तर भाजपचा पराभव करण्यासाठी काम करेन.” विशेष म्हणजे, हार्दिक पटेलने भाजपवरील आपला राग व्यक्त करताना काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भाजपपेक्षा काँग्रेस चांगला पक्ष असल्याचं सांगून काँग्रेसमध्येच खऱ्या अर्थानं लोकशाही रुजली असल्याचं मत त्याने मांडलं आहे.

याशिवाय वरुण आणि रेश्मा पटेल यांच्या भाजप प्रवेशावरुनही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “वरुण आणि रेश्मा पटेल हे दोघेही गद्दार असून, कालपर्यंत ते भाजपला शिव्या घालत होते. आता त्यांना भाजपने विकत घेतलं आहे.” हार्दिक म्हणाला की, “वरुण आणि रेश्मा यांच्यासह अजून दोघांनी भाजपत प्रवेश केला. अजून काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आपल्याला शंका आहे.”

- Advertisement -
- Advertisement -