Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशपीएनबीनंतर IDBI बॅंकेतही ७७२ कोटींचा महाघोटाळा!

पीएनबीनंतर IDBI बॅंकेतही ७७२ कोटींचा महाघोटाळा!

Idbi bank, Pnb bankनवी दिल्ली: पीएनबीमध्ये नीरव मोदीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर IDBI बॅंकेतही बनावट कागदपत्रांद्वारे ७७२ कोटी रूपयांचा महाघोटाळा उघडकीस आला. या महाघोटाळ्यामुळे शेअर मार्केट प्रचंडप्रमाणात कोसळले. हा घोटाळा आंध प्रदेश, तेलंगा येथील पाच शाखांमध्ये झाल्याचा नवीन प्रकार समोर आला.

IDBIबॅंकेत बनावट कागदपत्रांद्वारे  ७७२ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. हा घोटाळा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील ५ शाखांमध्ये झालेल्याची प्राथमिक माहिती आहे. सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. IDBIने या घोटाळ्याची माहिती बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला (बीएसआई) दिली आहे. बॅंकेने म्हटले आहे की, हा घोटाळा कर्जाच्या रूपाने करण्यात आला आहे. या प्रकरणात काही कर्जे ही २००९ ते २०१३या काळात घेण्यात आली होती. ही कर्जे मत्स्य उद्योगासाठी घोण्यात आले होते. यातील काही कर्जे ही बनावट कागदपत्रांद्वारे घेण्यात आल्याचे बॅंकेने म्हटले आहे. बॅंकेने पुढे म्हटले आहे की, बनावट कागदपत्रांमध्ये काही तलावांचे पठ्ठे दाखवण्यात आले आहेत. वास्तवात हे तलाव अस्तित्वाच नाहीत. इतकेच नव्हे तर, तारण म्हणून ठेवण्याता आलेल्या वास्तूंच्या किमतीही वाढवून लावण्यात आल्या आहेत.

घोटाळ्याची एकूण पाच प्रकरणे उघड

पंजाब नॅशनल बँकेप्रमाणे या प्रकरणातही कर्मचाऱ्यांचा हात असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात दिले गेलेले कर्ज आणि त्याची वितरण यात अनेक ठिकाणी गोलमाल आहे. प्रकरण पुढे येताच कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्याला बॅंकेने तत्काळ निलंबीत केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक अधिकारी सेवानिवृत्त झाला आहे. आतापर्यंत घोटाळ्याची एकूण पाच प्रकरणे पुढे आली आहेत. यापैकी दोन प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही दोन्ही प्रकरणे बशीरबाग आणि गुंटूर ब्रांचशी संबंधीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments