Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश“शेतकऱ्यांसमोर तर इंग्रजांना देखील झुकावं लागलं होतं; लढायचंच असेल तर चीन व...

“शेतकऱ्यांसमोर तर इंग्रजांना देखील झुकावं लागलं होतं; लढायचंच असेल तर चीन व पाकिस्तानशी लढा”

विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने, विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता संसदेतही गाजत आहे. संसदेत शेतकरी आंदोलनावर चर्चेसाठी १५ तासांचा वेळ ठरवण्यात आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आज विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी महेंद्र टिकैत यांचे नाव घेत, मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदी देखील सभागृहात उपस्थित होते. आझाद म्हणाले, शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीश सरकारला देखील झुकावं लागलं होतं. जर हे कायदे शेतकऱ्यांना अमान्य असतील, तर ते तत्काळ रद्द केले पाहिजे.

दिल्लीच्या तीन सीमांवर जिथं शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवला जात आहे. असं का केलं जात आहे? सरकारने शेतकऱ्यांचं ऐकायला हवं व त्यांच्यासोबत नाही लढलं पाहिजे. सरकारला लढायचंच असेल तर चीन आणि पाकिस्तानशी लढावं. शेतकऱ्यांशी लढून काहीच मिळणार नाही. असं देखील गुलामनबी आझाद यांनी यावेळी बोलून दाखवलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments