Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
HomeदेशCoronavirus | इंडिगोच्या कर्मचा-यांना मिळणार पूर्ण पगार!

Coronavirus | इंडिगोच्या कर्मचा-यांना मिळणार पूर्ण पगार!

IndiGo airlines employees will get full salaryमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. सर्व कार्यालयं, कंपन्या बंद आहेत. तर दुसरीकडे इंडिगो एअरलाइन्सने आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द असल्याने काही कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, या काळात पगार कपात होणार नसल्याने कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने मंगळवारी मध्यरात्री ते 31 मार्च दरम्यान देशांतर्गत उड्डाणे बंद केली आहेत. कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजय दत्ता म्हणाले की, कंपनीकडे एप्रिलसाठी आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग आहे. ते म्हणाले, ज्या या कर्मचार्‍यांना या कालावधीत सुट्टी दिली आहे, आम्ही त्यांच्या पगारामध्ये कपात करणार नाही.

दत्ता म्हणाले की, मागील काही दिवस विमान कंपनीसाठी खूप आव्हानात्मक होते आणि निश्चितच आपले उत्पन्न येत्या काही आठवड्यांत आमच्या खर्चापेक्षा कमी होणार आहे. अशा परिस्थितीत आमची पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते म्हणाले की, या तात्पुरत्या निलंबनाच्या कालावधीत कंपनी त्याची आतापर्यंतची बचत कर्मचार्‍यांचे वेतन देण्यासाठी वापरणार आहे. या सर्व प्रकारामुळे कर्मचा-यांना एका प्रकारे दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments