Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशगोष्ट आगळ्यावेगळ्या योगायोगाची

गोष्ट आगळ्यावेगळ्या योगायोगाची

आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी चिदंबरम यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु आहे ती चिदंबरम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलच्या आगळ्यावेगळ्या योगायोगाची.

अमित शाह हे गृहमंत्री असून चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच नेटकऱ्यांना आता नऊ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची आठवण झाली आहे. २०१० साली केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना चिदंबरम गृहमंत्री होते. त्यावेळी गँगस्टर सोहराबुद्दीन शेखच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयनं २५ जुलै २०१० रोजी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांना अटक केली होती. गांधीनगर इथल्या सीबीआय ऑफिसमध्ये शाह हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली होती.‘सोहराबुद्दीन बनावट चकमक’ प्रकरणी सीबीआयनं अमित शाह यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. यासंदर्भातील चौकशीसाठी सीबीआयनं दोनदा समन्स बजावूनही शाह उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी अमित शाह यांच्या घरी सीबीआयने धाड टाकली होती. तेव्हा शाह त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्येही सापडले नव्हते.अखेर सीबीआयने अमित शाह यांच्यासह १५ जणांवर २४ जुलै रोजी आरोपपत्र दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments