ही तर केवळ सुरुवात- हार्दीक पटेल

- Advertisement -

अहमदाबाद : कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल आदींना रोड शो करण्यास परवानगी नाकारली होती. पण पोलिसांचा मनाई आदेश झुगारून हार्दिकने अहमदाबादमध्ये रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर ही तर केवळ सुरुवात आहे,’ अशी प्रतिक्रिया हार्दीक पटेल याने व्यक्त केली.

हार्दिकने त्याच्या समर्थकांच्या मदतीने आज दोन हजार बाइक रस्त्यावर उतरवत दणक्यात रोड शो केला. १५ किलोमीटर पर्यंत सुरू असलेल्या या रोड शोमध्ये हजारो लोक सामिल झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन झाल्याने स्वत: हार्दिकही खूश होता. या रोड शोमध्ये तरुणांचा मोठ्याप्रमाणावर सहभाग होता. यावेळी बुजुर्गांचे आशीर्वाद घेण्यासही तो विसरला नाही. ‘ही तर केवळ सुरुवात आहे. आज दुपारनंतर नदीच्या पलिकडे जायचे आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे,’ असं हार्दिक म्हणाला. आज दुपारी ३ वाजता तो निकोलला जाणार आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनाच्यावेळी निकोलमध्ये सर्वाधिक हिंसा झाली होती. त्यामुळे निकोलमध्ये रोड शो करत इथल्या मतदारांशी तो संवाद साधणार आहे.

- Advertisement -