Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशअखेर अरुण जेटलींनी, राज्यसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

अखेर अरुण जेटलींनी, राज्यसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

arun jaitelyनवी दिल्ली : राज्यसभेवर पुन्हा नव्याने निवडून आल्यानंतर केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटलींनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्या संसदेतील कक्षात हा शपथविधी पार पडला.

वित्तमंत्री जेटलींनी उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. उत्तर प्रदेशातील इतर आठ भाजप सदस्यांचीही राज्यसभेसाठी निवड झाली आहे. यामध्ये जीव्हीएल नरसिंह राव, हरनाथ यादव, अशोक वाजपेयी, विजयपाल सिंह तोमर, कांता कर्दम, सकलदीप राजभार व अनिल अग्रवाल यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड व तेलंगणा या सहा राज्यातील राज्यसभेच्या २५ जागांसाठी मतदान झाले होते. राज्यसभेत एकूण ५९ रिक्त पदे निर्माण झाल्याने निवडणूक घेण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments