Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशकमलनाथांची अग्निपरीक्षा"या" कारणामुळे लांबणीवर!

कमलनाथांची अग्निपरीक्षा”या” कारणामुळे लांबणीवर!

Madhya Pradesh chief minister Kamal Nath, kamal nath, madhya pradesh floor test, kamal nath government floor test, floor test, madhya pradesh government crisis, congress, jyotiraditya scindiaभोपाळ : मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप होणार अशी अपेक्षा होती. विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी विधानसभेत गोंधळ झाल्याने विधानसभेचं कामकाम थेट 26 मार्चपर्यंत स्थगित केलं आहे. त्यामुळे बहूमत चाचणी सध्या तरी टळल्याचं दिसत आहे.
 मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमल नाथ सिंह यांना आज (16 मार्च) बहूमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी आज जाहीर केलेल्या कामकाजात बहूमत चाचणीचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष बहूमत चाचणीवर समोरासमोर उभे राहिल्याचं दिसत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपने राज्यपालांच्या आदेशानंतर आपल्या आमदारांना व्हिप जारी करत विधानसभेत हजर राहण्याचे आदेश दिले होते.
आज मध्य प्रदेश विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर जोरदार गोंधळ झाला. याआधी मुख्यमंत्र कमलनाथ सिंह यांनी राज्यपालांना पत्र लिहलं होतं. यात भाजपने काँग्रेस आमदारांना कर्नाटक पोलिसांच्या मदतीने बंदिस्त करुन ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच अशा वातावरणात बहुमत चाचणी घेणे लोकशाहीच्या विरोधात आणि असंवैधानिक असेल असं म्हटलं होतं. तसेच अशा परिस्थितीत बहूमत चाचणी घेण्याला काहीही महत्व उरत नाही असं सांगितलं.
विधानसभेचं कामकाम 26 मार्चपर्यंत स्थगित झाल्यानं सध्या तरी मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा लांबणीवर पडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर प्रचंड गदारोळ झाला. यानंतर विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित झालं.
दरम्यान, राज्यपाल लालजी टंडन यांच्या आदेशानुसार हात उंचावून बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी भाजपनं केली होती. ‘विधानसभेच्या सभागृहातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा काम करत नसल्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात यावे,’ अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते गोपाल भार्गव यांनी केली होती.
मध्य प्रदेशातील 22 आमदारांनी राजीनामा सादर केला असला, तरी सहा जणांचे राजीनामेच मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ 222 वर पोहचलं आहे, तर बहुमताचा आकडा 112 आहे. विरोधीपक्षातील भाजपकडे 107 आमदारांची ताकद आहे. काँग्रेसचं संख्याबळ (114 + 7 – 22 = 99) वर पोहोचलं आहे.
“बंदिस्त आमदारांची सुटका करा आणि बहूमत चाचणी घ्या”
राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विश्वासमताला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. ‘मी राज्यपालांना सांगितले आहे की मी फ्लोअर टेस्टसाठी तयार आहे. ज्या आमदारांना बंदिस्त करण्यात आले आहे त्यांची सुटका करावी. मी उद्या त्याविषयी सभापतींशी बोलणार आहे’ अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली होती.
ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने विधानसभेत बहुमत गमावले आहे, असा दावा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments