Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकथुआच्या पुनरावृत्तीने हरियाणा हादरला

कथुआच्या पुनरावृत्तीने हरियाणा हादरला

चंदीगड: जम्मूतल्या कथुआ प्रकरणामुळे देशभरात संताप असतानाच आता हरियाणातल्या यमुनानगरमध्ये अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हरियाणात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ४ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर मुलीचं डोकं भिंतीवर आपटून तिला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार लोकांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीचं मेडिकल करण्यात आलं असून पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, अशी माहिती स्टेशन पोलीस अधिका-यांनी दिली आहे.पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना यमुनानगरमधल्या जठलाना भागातील आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडितेचे आई-वडील घरी नव्हते. घरात पीडिता आणि तिचे भाऊ-बहीण होते. परंतु ते सर्व झोपेत होते. त्याच वेळी काही अज्ञातांनी घरात प्रवेश केला आणि अपहरण करून पीडित मुलीला एका मंदिर परिसराजवळ घेऊन गेले. पीडितेच्या जबाबानुसार, मंदिर परिसरात दोन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर इतर दोन आरोपी बलात्कार होताना पाहत होते. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित मुलीचं डोकं जोरजोरात भिंतीवर आपटलं. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्याच वेळी आरोपी फरार झाले. पीडिता जेव्हा शुद्धीत आली त्यावेळी तिनं लागलीच घर गाठलं आणि सर्व घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
कुटुंबीयांनी या प्रकाराची पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पीडितेचं मेडिकल केल्यानंतर चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आमची मुलगी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाही. तिला न्याय मिळवून देण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments