Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींच्या पत्नींना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीकडून साडी भेट

पंतप्रधान मोदींच्या पत्नींना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीकडून साडी भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी एकमेकांविरूध्द टीका करतात. मात्र, कोलकाता विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली. दोघांमध्ये संवाद झाला आणि ममता बॅनर्जी यांनी जशोदाबेन यांना साडी भेट दिली.

कोलकाता येथील विमानतळावरुन नवी दिल्लीकडे रवाना होण्यासाठी ममता बॅनर्जी मंगळवारी विमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यावेळी, ममता यांना जशोदाबेन या कोलकाता विमानतळावर दिसल्या. त्याक्षणी ममता यांनी धावत जाऊन जशोदाबेन यांची भेट घेतली. यावेळी, दोघांमध्ये सुखद संवादही झाला. जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या, धनबादवरुन परतताना त्या कोलकाता विमानतळावर आल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.

आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पश्चिम बंगालच्या समस्या मांडणार आहे. तसेच, राज्यासाठी निधींची तरतूद करण्याची विनंतीही जशोदाबेन करणार आहेत. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी त्यांच्या पत्नी जशोदाबेन आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट झाली त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments