Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशकुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, जी परमेश्वर उपमुख्यमंत्री!

कुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, जी परमेश्वर उपमुख्यमंत्री!

बंगळुरु:  कुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील. राज्यपाल वजूभाई वाला यांनी एच डी कुमारस्वामी आणि जी परमेश्वर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बंगळुरुत भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला.

औपचारिकरित्या आजपासून कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार सत्तेवर आलं. काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अवघ्या 55 तासात भाजप नेते येडियुरप्पा यांनी शनिवारी 19 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज कुमारस्वामी यांचा शपथविधीचा मुहुर्त ठरला होता.

यासाठी देशभरातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधील, शरद पवार, ममता बॅनर्जींसह दिग्गजांचा समावेश होता.

शपथविधीपूर्वी जोरदार पाऊस

कर्नाटकात कुमारस्वामींच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीकडे देशाच्या नजरा लागल्या होत्या. मात्र आज बंगळुरुत जोरदार पाऊस आला. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यात काहीसा व्यत्यय आला.  पण नंतर वातावरण निवळलं.

दिग्गजांची हजेरी

या शपथविधीसाठी देशातील विविध पक्षाच्या प्रमुखांसह दिग्गजांची उपस्थिती होती.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

बसपा अध्यक्ष मायावती

सपा नेते अखिलेश यादव

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

कमल हसन

या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

केरळचे मुख्यमंत्री पी विजयन

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव

विरोधकांचं शक्तिप्रदर्शन आणि शपथविधी
भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळेच कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा विरोधी पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार हे नेते तर होतेच, शिवाय इतर पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments