Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशलंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही - केंद्रियराज्यमंत्री...

लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

Ramdas Athawaleभारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकार तर्फे खरेदी करून तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. त्या स्मारकात आंबेडकरी अनुयायांच्या होणाऱ्या गर्दीबाबत तक्रार झाल्याने लंडन मधील स्थानिक पालिका असलेल्या कॅमडेन कौन्सिलने या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्ताची त्वरित दखल घेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही त्यासाठी त्वरित परराष्ट्र मंत्रालय आणि लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाशी आपण संपर्क साधता आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानसूर्य म्हणून अवघे विश्व सन्मान करीत असून लंडनमधील पालिकेचा हा निर्णय ब्रिटन सरकार ने रद्द करावा यासाठी भारत सरकार तर्फे प्रयत्न करीत असल्याचे असल्याचे ना. रामदास आठवले यांनी कळविले आहे.
लंडन मधील हेनरी रोड वरील या संग्रहालयास अन्यत्र हलविण्याचा लंडनमधील स्थानिक पालिकेचा निर्णय आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी लंडन च्या स्थानिक न्यायालयात महाराष्ट्र सरकार ने अपील केले आहे. भारत सरकारतर्फे ही ब्रिटन सरकार शी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. ब्रिटन आणि भारत दोन्ही सरकार मध्ये चांगले संबंध असून लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ नये म्हणून आपण सर्व स्तरावर प्रयत्न करीत असून वेळ.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments