Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशपॉर्नमुळेच होतात अल्पवयीन मुलींवर बलात्कार, भाजपा मंत्र्यांचा दावा

पॉर्नमुळेच होतात अल्पवयीन मुलींवर बलात्कार, भाजपा मंत्र्यांचा दावा

Bhupendra Singh, BJP, Madhya Pradeshमध्यप्रदेश: गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता मध्यप्रदेश सरकारनं पॉर्नोग्राफीवर राज्यात कायमस्वरूपी बंदी आणण्याचा विचार केला आहे. गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी बलात्कारासाठी पॉर्न कारणीभूत असल्याचा अजब दावा केला आहे. आम्हाला वाटतं अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि बलात्कार हे केवळ पॉर्नमुळे होतात. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये पॉर्नवर पूर्णपणे बंदी आणण्याचा विचार आम्ही करत आहोतअसं एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधल्या इंदुरमध्ये सहा वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. राजवाडा परिसरातील इमारतीच्या तळमजल्यावर तिचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती. शवविच्छेदन अहवालात तिची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणावर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपींना कडक शिक्षा केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. लहान मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना ऐकून माझं काळीज पिळवटून निघालं. हे शैतानी कृत्य आहे. आता समाजानं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आरोपी अटकेत आहेत त्यांना या शैतानीकृत्याबद्दल कडक शिक्षा होईल असं आश्वासन पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी दिलं.

त्याचप्रमाणे बलात्कारासाठी पॉर्नोग्राफी कारणीभूत असून राज्यात पॉर्नवर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार असल्याचंही राज्यसरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यासाठी लवकरच कडक कायदा करण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments