54 प्रवाशांनी भरलेली बस सरोवरात कोसळली; 42 मृतदेह काढले बाहेर

- Advertisement -

रामपूर, मध्य प्रदेश:  मध्य प्रदेशच्या सीधी येथे सकाळी प्रवाशी बसला मोठा अपघात घडला. या ठिकाणी सकाळी 7 वाजेच्या सुमारास 54 प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावरून घसरून थेट बाणसागर सरोवरात कोसळली. या तलावातून 42 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 6 प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले. रामपूर जिल्ह्यातील नेकीन परिसरात घडलेल्या या घटनेत 50 जण मृत्यूमुखी पावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. बसमधध्ये 54 प्रवाशी होते. नेकीन परिसरात आली असताना बस रस्ता सोडून थेट सरोवरमध्ये पडली. सरोवरातील पाण्याचा वेग जास्त असल्याने बचाव पथक पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने यात पडलेले लोक दूर वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -