शरद पवार आणि अनिल देशमुखांमध्ये दिल्लीत गुफ्तगू;देशमुख म्हणाले…

- Advertisement -
maharashtra-home-minister-anil-deshmukh-ncp-sharad-pawar-mukesh-ambani-sachin-vaze
maharashtra-home-minister-anil-deshmukh-ncp-sharad-pawar-mukesh-ambani-sachin-vaze

नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. याचदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले होते. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. बैठकीनंतर अनिल देशमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गृहमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चेसंबंधीही विचारण्यात आलं. मात्र याबाबत त्यांनी बोलण्यास टाळलं.

“शरद पवारांनी मुंबईत सध्या ज्या ताज्या घडामोडी सुरु आहेत त्याची माहिती घेतली. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं सापडली त्यातही काय घडामोड सुरु आहे याची माहिती त्यांनी घेतली. एनआयए आणि एटीएस या घटनेचा तपास करत असून राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे.

हेही वाचा : सचिन वाझे – मनसुख हिरेन १७ फेब्रुवारीला १० मिनिटांसाठी भेटले होतेे

योग्य दिशेने तपास सुरु असून जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर राज्य शासनाच्या मार्फत कारवाई केली जाईल. पण जोपर्यंत एनआयएचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, चौकशी पूर्ण येत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यातून ज्या काही गोष्टी समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल,” असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here