Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशसैतानी कृत्य: पत्नीची हत्या करून मृतदेहाचे ११ तुकडे केले

सैतानी कृत्य: पत्नीची हत्या करून मृतदेहाचे ११ तुकडे केले

Man kills wifeसुरत : दुसऱ्या पत्नीच्या शरिराचे अकरा तुकडे करुन शहरातील वेगवेगळ्या भागात फेकले. हि घटना सुरतमध्ये घडली.या घटनेमुळे एकच खळबड उडाली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. 

या विषयी अधिक माहिती अशी की,शाहनवाज शेख याने आपल्या पत्नी जुलेखाची हत्या केली. तिच्या शरीराच्या चिरलेला भागांना शहराच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले. जुलेखा ही शाहनवाजची दुसरी पत्नी असून त्यांच्यासोबतच राहणाऱ्या त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर तिचे वारंवार भांडण होत असे. या रोजच्या भांडणांना वैतागून शाहनवाजने हे संतापजनक कृत्य केले. मृतदेहाचे तुकडे फेकत असताना गस्तीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला शाहनवाज आढळून आला. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा स्वीकारला. आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत शाहनवाजला अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments