Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशसोमवारी बुधाचे अधिक्रमण; तेरा वर्षानंतर येणार योग!

सोमवारी बुधाचे अधिक्रमण; तेरा वर्षानंतर येणार योग!

MERCURY SUN orbit
बुध ग्रह हा सोमवारी सूर्यबिंबावरून अधिक्रमण करणार आहे. परंतु हे अधिक्रमण भारतामध्ये दिसणार नसून केवळ उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड या देशांमध्येच दिसणार आहे. हा योग तेरा वर्षांनंतर पुन्हा येणार आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी होणारे बुध ग्रहाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. यूरोप, आफ्रिका, दक्षिण ग्रीनलॅंड, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, अलास्का सोडून उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलॅण्ड येथून दिसणार असल्याने तेथील खगोलप्रेमींसाठी ही अधिक्रमण निरीक्षणाची पर्वणी असणार आहे असेही खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

पृथ्वीवरून पाहतांना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो. त्यालाच बुध ग्रहाचे अधिक्रमण असे म्हणतात. अशी माहितीही सोमण यांनी दिली. बुध ग्रहाप्रमाणेच शुक्र ग्रहाचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते. बुध ग्रहाचे अधिक्रमण मात्र दुर्बिणीतून पहावे लागते. हा योग तेरा वर्षानंतर जुळणार असल्यामुळे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments