Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशआता मोबाईल नंबर होणार १३ अंकांचा!

आता मोबाईल नंबर होणार १३ अंकांचा!

महत्वाचे…
१. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
२. १३ अंकी क्रमांकामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता
३. टेलिकॉम मंत्रालयाकडून मोठे फेरबदल करण्यात


मुंबई: भारतात मोबाईल नंबरसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचलित पद्धतीत टेलिकॉम मंत्रालयाकडून मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यामुळेच सध्याचा मोबाईलचा १० आकडी नंबर जाऊन त्याजागी १३ अंकी मोबाईल नंबर येणार आहे. ऑक्टोबर २०१८ पासून १० अंकाचा नंबर १३ अंकी करण्यासाठी पोर्ट प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

टेलिकॉम मंत्रालयाने यासंदर्भात सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्सना सूचित केले आहे. ८ जानेवारी २०१८ रोजी यासंदर्भाती आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी हा निर्णय अंमलात आणण्यासाठी कामाला सुरुवात केल्याचे समजते. यामुळे ग्राहकांची पुन्हा पंचाईत होणार आहे. मोबाईल नंबर अधिक सुरक्षित करण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते. १ ऑक्टोबर २०१८ पासून १० अंकाचा नंबर १३ अंकी करण्यासाठी पोर्ट प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मशिन टू मशिन नेटवर्क (M2M) असणाऱ्या ग्राहकांना १ जुलै २०१८ पासून १३ अंकी क्रमांकाचा वापर करणे अनिवार्य असेल. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर भारत हा सर्वात मोठा मोबाईल क्रमांक असणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरेल. सध्या चीनमध्ये ११ अंकी मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. मात्र, या क्रमांकामध्ये एरिआ कोडचा समावेश नसतो.
मात्र, या १३ अंकी क्रमांकामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या बँक आणि इतर ठिकाणी ग्राहकांना देणाऱ्या अर्जांमध्ये केवळ १० अंकी मोबाईल नंबर नमूद करण्याची सोय आहे. तसेच हा मोबाईल नंबर लक्षात ठेवणेही कठीण जाणार आहे. याशिवाय, ज्यांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न आहे, त्यांना नवा मोबाईल नंबर अस्तित्वात आल्यानंतर अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments