Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशमोदींना पंतप्रधान असल्याचा विसर पडला - चिदंबरम

मोदींना पंतप्रधान असल्याचा विसर पडला – चिदंबरम

नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीच्या काही दिवस अगोदर माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या गुजरात निवडणूक प्रचार दौऱ्यावरून लक्ष्य केले. मोदी गुजरातमध्ये स्वत:चा प्रचार करत आहेत, त्यांना ते पंतप्रधान असल्याचा विसर पडल्याची टीका चिदंबरम यांनी केली. याबाबतचे काही ट्विट चिदंबरम यांनी केले.

मोदींचा दौरा हा स्वत:साठी आहे, भुतकाळामध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे दिलेले अश्वासन न पाळल्याने गुजरातच्या जनतेमध्ये त्यांच्याबाद्दल प्रचंड रोष आहे. यामुळे मोदींची खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी गुजरातमध्ये ते प्रचारसभा घेत आहेत. हे करत असताना त्यांना पंतप्रधान असल्याचा विसर पडल्याचे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
“पंतप्रधान बेरोजगारी, गुंतवणूकीची कमतरता, एसएमईमध्ये घसरण, स्थिर निर्यात आणि भाववाढीबद्दल का चर्चा करीत नाहीत? या कटू सत्याबद्दल कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही, असे भाजपच्या गुजरात विकास मॉडेल बाबत चिदंबरम म्हणाले. काँग्रेस नेते पुढे म्हणाले, “मोदी हे विसरले की गांधीजी भारतीय आहेत आणि गुजरातचे पुत्र आहेत; गांधीजी राष्ट्रपिता होते, आणि तेच राष्ट्रपिता आहेत. आणि गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्याचे शस्त्र म्हणजे काँग्रेस पक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments