Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशमोदींनी देशाला खूप पकवलं, त्यांनी आता हिमालयात जावं - जिग्नेश मेवाणी

मोदींनी देशाला खूप पकवलं, त्यांनी आता हिमालयात जावं – जिग्नेश मेवाणी

नवी दिल्ली : गुजरातमधील दलित आंदोलनाचा युवा चेहरा बनलेले नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. त्यांनी संन्यास घेऊन हिमालयात जावं, असा खोचक सल्ला दिला. तसेच आपण केलेल्या टीकेबाबत खुद्द राहुल गांधी यांनीही माफी मागण्यास सांगितले तरी माफी मागणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

जिग्नेश मेवाणी म्हणाले, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. ते आपली जुनी रटाळ भाषणे ऐकवून तमाम भारतीयांना नुसतं पकवत आहेत. त्यांच्या खोट्या आश्वासनांना युवा वर्ग आता कंटाळला आहे. म्हणूनच त्यांनी नेहमीची जुमलेबाजी आता बंद करून राजकारणातून निवृत्ती स्वीकारावी आणि हिमालयात जाऊन तेथेच यापुढचं जीवन जगावं,” या वक्तव्यानंतर माफी मागणार का अशी विचारणा केली असता मेवाणी यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला.

गुजरातमध्ये अमित शहा १५० जागा जिंकण्याचा दावा करत होते. मात्र त्यांना शंभरीही गाठता आलेली नाही, त्यांचे पुरते गर्वहरण झालंय. २०१९ सालीसुद्धा हेच होईल. हा आमच्या युवा नेत्यांच्या आंदोलनाचा विजय आहे. आम्ही सभागृहापासून रस्त्यापर्यंत आपल्या आंदोलनावर भर देऊ आणि यांना २०१९ साली सत्तेतून खाली खेचू. देशात फूट पाडणारे राजकारण जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे देशाला आता हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि माझ्यासारख्या आंदोलनातून पुढे आलेल्या युवा नेत्यांची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments