Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशमाकडाने केले १६ दिवसाच्या बाळाचे अपहरण

माकडाने केले १६ दिवसाच्या बाळाचे अपहरण

Monkey, Orisaकटक – ओडीशामधील कटक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १६ दिवसाच्या बाळाला घरातून एका माकडाने पळवल्याची महिती मिळाली आहे. या बाळाला शोधण्यासाठी संबंधित अधिकारी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत आहेत.

तालाबस्ता गावातील घरात आईच्या बाजूला बाळ झोपलेले असताना एका माकडाने त्याला उचलून पळवले. आईने माकडासोबत बाळाला पाहून आरडा-ओरड केल्यावर गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिल्याचे शोधमोहिमेतील वनाधिकाऱ्याने सांगितले. “बाळ लहान असल्यामुळे त्याच्या रडण्याचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्याला शोधणे कठीण झाले आहे”, असेही तो म्हणाला. या बाळाला शोधण्यासाठी दामापदा वनविभागाचे मुख्य अधिकारी संग्राम केशरी मोहन्तींच्या मार्गदर्शनाखाली ३० वनाधिकाऱ्यांचे ३ पथक बाळाला शोधत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments