Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशवसतीगृहातील मुलींची कपडे उतरवून तपासणी!

वसतीगृहातील मुलींची कपडे उतरवून तपासणी!

सागर: वसतीगृह परिसरात वापरलेले सॅनिटरी पॅड आढळून आल्याने वॉर्डनने मुलींची कपडे उतरवून तपासणी केल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील सागर येथील डॉ. हरी सिंह गौर विद्यापीठातील वसतीगृहात घडली. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली.

कुलगुरू आर. पी. तिवारी यांनी या घटनेची निषेध करत, मुलींची माफी मागितली. “ही घटना दुर्दैवी आणि  निंदनीय असून सर्व विद्यार्थिनी माझ्या मुलींप्रमाणे आहेत आणि मी त्यांची माफी मागतो.” या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि वॉर्डन दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन कुलगुरूंनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments